शबरीमाला मंदिरात स्त्रीयांना प्रवेश, सर्वोच्च न्यायलयाच्या आदेशाचे स्वागत – चित्रा वाघ VIDEO

शबरीमाला मंदिरात स्त्रीयांना प्रवेश, सर्वोच्च न्यायलयाच्या आदेशाचे स्वागत – चित्रा वाघ VIDEO

केरळमधील सबरीमला मंदिरात महिलांना प्रवेश देण्यासंदर्भात सुप्रीम कोर्टाने आज निकाल दिला. महिलांना मंदिरात प्रवेशबंदी करणे घटनाबाह्य असल्याचे सांगत सुप्रीम कोर्टाने सबरीमला मंदिरात महिलांनाही पूजा करण्याचाही अधिकार दिला आहे.सबरीमला हे केरळमधील प्रसिद्ध मंदिर असून या मंदिरात १० ते ५० वर्षांच्या महिलांना प्रवेशबंदी होती. रजोनिवृत्ती झालेल्या महिलांना प्रवेश दिला जातो. याविरोधात इंडियन यंग लॉयर्स असोसिएशनने महिलांच्या प्रवेशबंदीविरोधात सुप्रीम कोर्टात २००६ मध्ये याचिका दाखल केली होती. गेल्या १२ वर्षांपासून हे प्रकरण प्रलंबित होते. अखेर शुक्रवारी सुप्रीम कोर्टाचे सरन्यायाधीश दीपक मिश्रा यांच्या अध्यक्षतेखालील घटनापीठाने निर्णय दिला.

दरम्यान या निर्णयाचं महिलांकडून स्वागत करण्यात आलं आहे. राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या नेत्या चित्रा वाघ यांनी कोर्टाच्या या निर्णयाचं स्वागत केलं आहे. शबरीमाला मंदिरात स्त्रीयांना प्रवेश सन्माननीय असून सर्वोच्च न्यायलयाच्या आदेशाचे स्वागत करते असं चित्रा वाघ यांनी म्हटलं आहे.

 

COMMENTS