मुंबई : तुम्ही एका महिलेला पुरुषासोबत लिव्ह इन रिलेशनमध्ये राहू देता, कुठलाही गुन्हा नाही, वर्षभर एकत्र राहिले आणि नंतर सांगितलं माझा बलात्कार झाला” अशा शब्दात समाजवादी पार्टीचे आमदार अबू आझमी यांनी प्रतिक्रिया दिली होती. त्यास भाजपच्या नेत्या चित्रा वाघ यांनी प्रतिउत्तर दिले आहे.
“देशात कायदाच चुकीचा आहे. कायद्यानुसार कुठलीही स्त्री लग्नाशिवाय कुठल्याही व्यक्तीसोबत राहू शकते. लिव्ह इन रिलेशन… व्हॉट इज धीस लिव्ह इन रिलेशनशीप? तर तुम्ही एका महिलेला पुरुषासोबत लिव्ह इन रिलेशनमध्ये राहू देता, कुठलाही गुन्हा नाही, वर्षभर एकत्र राहिले आणि नंतर सांगितलं माझा बलात्कार झाला” अशा शब्दात अबू आझमी यांनी संताप व्यक्त केला.
लिव्ह इन रिलेशनशीपमध्ये राहणाऱ्या महिलांच्या हेतूविषयी शंका उपस्थित करणारे समाजवादी पक्षाचे नेते यांना भाजप नेत्या चित्रा वाघ यांनी फटकारले आहे. लिव्ह इन म्हणजे सोबत राहणं फक्त, तो शरीरसंबंधांचा परवाना नाही. अबू आझमींना हे माहित नसेल लग्नाची बायकोही नवऱ्याविरोधात बलात्काराची तक्रार करू शकते. स्वतःला बायकोचे मालक समजणाऱ्यांना अशा कायदेशीर तरतूदींमागची खोली कशी कळणार, अशी घणाघाती टीका चित्रा वाघ यांनी केली आहे.
लिव्ह इन …म्हणजे सोबत राहणं फक्त…तो शरीरसंबंधांचा परवाना नाही
अबू आझमीना हे माहित नसेल लग्नाची बायकोही नवऱ्याविरोधात बलात्काराची तक्रार करू शकते
स्वतःला बायकोचे *मालक* समजणाऱ्यांना अशा कायदेशीर तरतूदींमागची खोली कशी कळणार ? pic.twitter.com/mWZumninMZ
— Chitra Kishor Wagh (@ChitraKWagh) February 17, 2021
COMMENTS