विधानसभेत हक्कभंग आणणार’, मुनगंटीवारांचा निर्वाणीचा इशारा

विधानसभेत हक्कभंग आणणार’, मुनगंटीवारांचा निर्वाणीचा इशारा

मुंबई : सध्या महाविकास आघाडी सरकार विरुध्द राज्यपाल असा संघर्ष निर्माण होत आहे. राज्य सरकार 12 आमदारांच्या नियुक्तीवरुन राज्यपालांशी खुला संघर्ष करत आहे. तसेच राज्यपालांना विमानातून उतरवला आहे. यावर . इतकच नाही तर विधानसभेत याबाबत हक्कभंग आणणार असल्याची घोषणाही भाजप नेते सुधीर मुनगंटीवार यांनी केली.

भाजप नेते सुधीर मुनगंटीवार यांनी राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांची भेट घेतली. यावेळी त्यांनी मराठवाडा आणि विदर्भ वैधानिक विकास महामंडळाबाबत राज्यपालांशी चर्चा केली. दोन्ही वैधानिक विकास महामंडाळांचा कालावधी 30 एप्रिल 2020 ला संपला आहे. मात्र, विदर्भ आणि मराठवाड्यासाठी हे महामंडळ गरजेचं आहे. त्यामुळे सरकारनं ऐकलं नाही तर याद राखा. विदर्भ आणि मराठवाड्यासाठी आम्ही सरकारला सोडणार नाही, असा इशाराच मुनगंटीवार यांनी ठाकरे सरकारला दिला आहे.

दुसरीकडे वेगवेगळ्या विभागांचा असमतोल विकास करायचा आणि तिजोरीवर डाका टाकायचा, सरकारमध्ये सध्या हेच सुरु असल्याचा गंभीर आरोप मुनगंटीवार यांनी केलाय. विदर्भ आणि मराठवाडा वैधानिक विकास महामंडळासाठी टोकाचा संघर्ष करणार असल्याचा दावाही त्यांनी केला.

COMMENTS