मुंबई – शेतकरी धर्मा पाटील यांच्या मृत्यू प्रकरणाची चौकशी मुख्य सचिवांकडे सोपविण्यात आली असून पुढच्या मंत्रीमंडळ बैठकीपूर्वी या चौकशीचा अहवाल सादर करण्याचे आदेश मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिले आहेत. मुख्यमंत्र्यांनी दिलेल्या आदेशावरुन दोषी अधिकाऱ्यांवर कारवाई होणार असल्याचे संकेत व्यक्त केले जात आहेत.
सरकारी अधिकाऱ्यांनी धर्मा पाटील यांना जमिनीचा योग्य मोबदला देण्यास टाळाटाळ केली असल्याचं आता जवळपास उघड झालं आहे. शेजारच्या जमीन मालकांना बाजारभावाने मोबदला दिला मात्र तोच भाव पाटील यांना देण्यास अधिकाऱ्यांनी हात आखडते घेतले असल्याचं वास्तव समोर आलं आहे. याप्रकरणी कुठलाही अधिकारी दोषी आढळल्यास त्यांच्यावर कारवाई केली जाणार असून याबाबतचे स्पष्ट संकेत यावेळी मुख्यमंत्र्यांनी दिले आहेत.
COMMENTS