मुंबई – राज्यात सत्तास्थापनेचा तिढा अजूनही कायम आहे. विधानसभा निवडणुकीचा निकाल लागून 15 दिवस उलटले आहेत. त्यामुळे आज जर हा तिढा सुटला नाही तर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस राजीनामा देण्याची शक्यता आहे. आज संध्याकाळपर्यंत मुख्यमंत्र्यांसह सर्व मंत्री सरकारी गाड्या आणि इतर सुविधा परत करु शकतात अशी माहिती सूत्रांनी दिली आहे. त्यामुळे निवडणुकीपूर्वी पुन्हा मीच मुख्यमंत्री होणार असा दावा करणाय्रा फडणवीस यांच्यावर आता राजीनामा देण्याची वेळ येणार का? हे पाहण गरजेचं आहे.
दरम्यान शिवसेना आणि भाजप अजूनही मुख्यमंत्रीपदावर ठाम आहे. त्यामुळे सत्तास्थापनेचा तिढा अजूनही कायम आहे. तेराव्या विधानसभेचा कार्यकाळ संपायला अवघे काही तास शिल्लक आहेत. तेरावी विधानसभा ही 10 नोव्हेंबर 2014 रोजी अस्तित्त्वात आली होती. 9 नोव्हेंबर रोजी पाच वर्षे पूर्ण होत असल्याने विधानसभेचा कार्यकाळ हा संपुष्टात येणार आहे. घटनात्मक तरतुदीनुसार त्यापूर्वी नवं सरकार अस्तित्त्वात आलं नाही तर घटनात्मक पेच निर्माण होणार आहे.
COMMENTS