नवी दिल्ली – ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांनी अखेर उपोषण मागे घेण्याचा निर्णय घेतला आहे. आज सलग सातव्या दिवशी अण्णांचं आंदोलन सुरु असून मुख्यमंत्र्यांच्या मध्यस्थीनंतर आज दुपारी ते आपल्या उपोषणाची सांगता करणार आहेत. पंतप्रधान कार्यालय आणि कोअर कमिटीच्या बैठकीनंतर अण्णांनी हा निर्णय घेतला आहे. या बैठकीत अण्णांच्या बहुतांश मागण्या मान्य करण्यात आल्या असल्याची माहिती आहे.तसेच आज दुपारी खुद्द मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस अण्णांच्या भेटीसाठी दिल्लीला जाणार आहेत. आजचा सातवा दिवस असल्यामुळे अण्णांची प्रकृती खालावली आहे.
दरम्यान प्रकृती खालावल्यामुळे डॉक्टरांनी अण्णांना तात्काळ हॉस्पिटलमध्ये हलवण्याची सूचना केली होती. परंतु हॉस्पिटलमध्ये जाण्यास अण्णांनी नकार दिला असून आपण लोकांसाठी आंदोलन करत आहे. हार्टअटॅकनं मरण्यापेक्षा देशासाठी मरणं चांगलं, म्हणून उपोषण करणारच, असा निर्धार अण्णा हजारे यांनी केला होता. परंतु त्यांची प्रकृती खालावत चालल्यामुळे सरकारनं अखेर त्यांच्या बहुतांश मागण्या मान्य करण्याचा निर्णय घेतल्यामुळे अण्णा हजारे आंदोलन अखेर मागे घेणार आहेत.
COMMENTS