…तर तुमच्या शहरालाही मिळणार कोट्यवधींचं बक्षीस, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची घोषणा !

…तर तुमच्या शहरालाही मिळणार कोट्यवधींचं बक्षीस, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची घोषणा !

मुंबई – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते गुरुवारी विटा, सावनेर, सासवड व कळमेश्वर नगरपरिषदांना कंपोस्ट खताच्या हरित ब्रँडच्या प्रमाणपत्रांचे वाटप करण्यात आले. त्यावेळी राज्यातील सर्व शहरांतील स्वच्छता वाढवण्यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी एका स्पर्धेचं आयोजन केलं आहे. राज्यातील सर्व शहरांमध्ये १ जानेवारी ते २८ फेब्रुवारी या कालावधीत स्वच्छ वॉर्ड स्पर्धा घेण्यात येणार असल्याची घोषणा मुख्यमंत्र्यांनी केली आहे. तसेच स्पर्धेतील विजेत्या वॉर्डला आणि  स्वच्छ सर्वेक्षणातील गुणानुक्रमातील अव्वल शहरांना कोट्यवधींचं बक्षीस राज्य शासनामार्फत देण्यात येणार असल्याची घोषणा मुख्यमंत्र्यांनी केली आहे.

दरम्यान या स्वच्छ वॉर्ड स्पर्धेत पहिल्या ३ क्रमांकावर येणा-या शहराला १५ कोटींचं बक्षीस देण्यात येणार आहे. तर ४ ते १० क्रमांकात येणाऱ्या शहरांना १० कोटींचं  बक्षीस देण्यात येणार असून  ११ ते ५० क्रमांकात येणा-या शहरांना ५ कोटी प्रोत्साहनपर बक्षिसे देण्यात येणार असल्याची घोषणा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केली आहे. तसेच या योजनेत समाविष्ट नसलेल्या शहरांच्या स्पर्धेत पश्चिम विभागीय गुणानुक्रमात येणाऱ्यांसाठीही बक्षीस देण्यात येणार असल्याचं मुख्यमंत्र्यांनी म्हटलं आहे.

शहरांमधील वाढतं प्रदूषण आणि अस्वच्छतेवर आळा घालण्यासाठी हे प्रोत्साहनपर बक्षिसं देऊन राज्यातील शहरांमध्ये स्वच्छता वाढवण्याचा आमचा प्रयत्न असल्याचं मुख्यमंत्र्यांनी म्हटलं आहे. मुख्यमंत्र्यांच्या या घोषणेमुळे राज्यातील अनेक शहरं सहभाग घेऊन आपलं शहर स्वच्छ बनवतील असा विश्वास वर्तवण्यात येत आहे.

COMMENTS