मुंबई – राज्यातील शेतक-यांसाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मोठी घोषणा केली असून ज्या शेतकऱ्यांची तूर-हरभऱ्याची नोंदणी झाल्यानंतरही विकत घेता आली नाही त्या शेतक-यांना 1 हजार रुपये प्रति क्विंटल अनुदान देण्याचा निर्णय घेण्यात आला असल्याचं मुख्यमंत्र्यांनी म्हटलं आहे. तसेच गारपीट व अवकाळी पावसामुळे झालेल्या नुकसानीची 160 कोटींची अनुदानाची रक्कम देण्यात येणार असल्याचंही यावेळी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी म्हटलं आहे.
दरम्यान दूध-भुकटी निर्यातीवर अनुदान देण्याचा निर्णय विचाराधीन असून त्यासाठी अभ्यास गट तयार केला असल्याचंही मुख्यमंत्र्यांनी म्हटलं आहे. तसेच काँग्रेस – राष्ट्रवादीने आपली विश्वासार्हता गमावली असल्याची टीकाही यावेळी मुख्यमंत्र्यांनी केली आहे. तसेच शेतकऱ्यांचा त्यांच्यावर विश्वास राहिला नाही त्यामुळे हे पक्ष शेतकऱ्यांच्या मागे लपून आंदोलन करत असल्याचा हल्लाही मुख्यमंत्र्यांनी यावेळी चढवला आहे. तसेच 15 वर्षात जेवढी खरेदी झाली नाही तेवढी खरेदी आमच्या सरकारने केली असल्याचा दावाही यावेळी त्यांनी केला आहे.
COMMENTS