‘या’ नेत्याला मिळाला कॅबिनेट मंत्र्याचा दर्जा, मुख्यमंत्र्यांनी केली घोषणा !

‘या’ नेत्याला मिळाला कॅबिनेट मंत्र्याचा दर्जा, मुख्यमंत्र्यांनी केली घोषणा !

नवी मुंबई – अण्णासाहेब पाटील यांच्या 85 व्या जयंतीनिमित्त आज नवी मुंबई येथे कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं होतं. या कार्यक्रमाला अण्णासाहेब पाटील आर्थिक विकास महामंडळाचे अध्यक्ष नरेंद्र पाटील यांच्यासह मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे उपस्थित होते. या कार्यक्रमादरम्यान नरेंद्र पाटील यांना कॅबिनेटचा दर्जा देण्यात आल्याची घोषणा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केली आहे.

ज्या वेळेस मी मुख्यमंत्री झालो तेंव्हा मुख्यमंत्री म्हणून माथाडी संघटना मोडीत काढणार असल्याचं काही लोक म्हणत होते. परंतु नरेंद्र पाटील हे मागील तीन वर्षात जेवढा वेळा माझ्याकड़े आले तेव्हा मी त्यांचे सर्व प्रश्न मार्गी लावले असल्याचं मुख्यमंत्र्यांनी यावेळी म्हटलं आहे. तसेच मला माथाडी च्य प्रश्नावर राजकारण नको असून कोण कोणत्या पक्षाचा आहे याच्याशी मला काही देणंघेणं नाही. सरकारची शक्ती माथाडी कामगरांच्या सोबत असून तुमचे प्रश्न सोडवल्याशिवाय आम्ही गप्प बसणार नसल्याचं वक्तव्यही यावेळी मुख्यमंत्र्यांनी केलं आहे.

आम्ही स्वतःच्या फायदासाठी किंवा ईगोसाठी निर्णय घेत नाहीत. वडाळा आणि चेम्बूर येथील घरांचा प्रश्न देखील सोडवण्यासाठी आम्ही सकरात्मक आहोत. तो प्रश्न सुद्धा मार्गी लावणार असून मराठा समाज आणि बहुजन समाजासाठी गेल्या 50 वर्षात जे निर्णय घेतले गेले नाहीत ते निर्णय आम्ही घेतले असल्याचंही मुख्यमंत्र्यांनी यावेळी म्हटलं आहे.

मराठा समाजला आम्ही आरक्षण देणार असून मराठा समाजाच्या शिक्षणाचा प्रश्न असेल किंवा होस्टलचा प्रश्न असेल तो सुद्धा आम्ही मार्गी लावत आहोत असंही यावेळी मुख्यमंत्र्यांनी म्हटलं आहे.

दरम्यान नुकत्याचं झालेल्या महामंडळ नियुक्त्यांमध्ये नरेंद्र पाटील यांच्याकडे अण्णासाहेब पाटील आर्थिक विकास महामंडळाचे अध्यक्षपद देण्यात आलं आहे. यापूर्वी ते राष्ट्रवादी काँग्रेसचे पक्ष सदस्य आणि महाराष्ट्र लेबर सेलचे अध्यक्ष होते. परंतु त्यांना भाजपनं अण्णासाहेब पाटील महामंडळाच्या अध्यक्षपदाची जबाबदारी सोपवल्यानंतर त्यांनी राष्ट्रवादीला सोडचिठ्ठी दिली. त्यानंतर आज मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी नरेंद्र पाटील यांना कॅबिनेट मंत्रीपदाचा दर्जा देण्यात आला असल्याची घोषणा केली.

दरम्यान राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीला सोडचिठ्ठी दिल्यानंतर माथाडी कामगारांचे मुख्यमंत्री तुम्ही प्रश्न सोडवणार असाल तर मी तुमच्या घरातली भांडी घासायला सुद्धा तयार आहे असं म्हटलं होतं. तसेच माथाडी कामगार कायदा करावा,
मी माथाडी कामगरांना एका व्यासपिठावर आणावं अशी मागणीही यावेळी नरेंद्र पाटील यांनी केली आहे.

COMMENTS