नागपूर – ‘नाणार येथील प्रस्तावित रिफायनरी हा समुद्र किनाऱ्यावरील प्रकल्प असल्यामुळे तो विदर्भात आणणे शक्य नसून या भागात प्रकल्प आणावयाचा असेल तर याठिकाणी आधी समुद्र आणावा लागेल असा टोमणा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांना लगावला आहे.
दरम्यान रत्नागिरी जिल्ह्यातील नाणार रिफायनरी प्रकल्पाला उद्धव ठाकरेंनी विरोध केल्यानंतर उद्योगमंत्री सुभाष देसाई यांनी अधिसूचना रद्द करत असल्याची घोषणा केली होती. परंतु त्यानंतर उद्योगमंत्र्यांना हा अधिकारच नसल्याचं मुख्यमंत्री फडणवीस यांनी म्हटलं होतं. त्यानंतर या वादात भाजपचे काटोल येथील आमदार आशीष देशमुख यांनी उडी घेत ‘विदर्भात हा प्रकल्प आणण्याची मागणी केली होती. त्यानंतर ही संधी साधून उद्धव यांनी पावसाळी अधिवेशनावरून सरकारची कोंडी करणार असल्याचं म्हटलं होतं. प्रकल्प विदर्भात नेत असल्याचे मुख्यमंत्र्यांनी आधी जाहीर करावे, त्यानंतर पावसाळी अधिवेशन नागपुरात घेऊ देऊ, अशी भूमिका त्यांनी घेतली होती. त्यानंतर मुख्यमंत्र्यांनी उद्धव ठाकरे यांना टोला लगावला आहे.
COMMENTS