शरद पवारांच्या पायाला जखम, सक्तीची विश्रांती घेण्याचा डॉक्टरांचा सल्ला !

शरद पवारांच्या पायाला जखम, सक्तीची विश्रांती घेण्याचा डॉक्टरांचा सल्ला !

पुणे – राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे अध्यक्ष शरद पवार यांच्या पायाला जखम झाली असून 15 मेपर्यंत त्यांना सक्तीची विश्रांती घेण्याचा सल्ला डॉक्‍टरांनी दिला आहे. त्यामुळे येत्या पंधरा दिवसांतील शरद पवार यांचे कार्यक्रम पुढे ढकलण्यात आले असल्याची माहिती आहे. परंतु 4 मे रोजी वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूट (व्हीएसआय) येथील कार्यक्रम व कर्मवीर भाऊराव पाटील यांच्या पुण्यतिथीनिमित्त सातारा येथे 8 व 9 मे रोजी होणाऱ्या रयत शिक्षण संस्थेच्या बैठकीला उपस्थित राहणार असल्याचे पवार यांनी म्हटलं आहे.

दरम्यान पुणे येथे झालेल्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या प्रदेश कार्यकारणीच्या बैठकीनंतर पवार यांच्या पायाला जखम झाल्याने त्यांना पुढील पंधरा दिवस विश्रांती घेण्याचा सल्ला डॉक्‍टरांनी दिला आहे. त्यामुळे पुढील पंधरा दिवसांचे कार्यक्रम पुढे ढकलण्यात येणार आहेत. यापूर्वीही शरद पवार यांच्या पायाला मोठी जखम झाली होती.

 

COMMENTS