…तर औरंगाबाद महापालिका बरखास्त करु, मुख्यमंत्र्यांचे आयुक्तांना निर्देश !

…तर औरंगाबाद महापालिका बरखास्त करु, मुख्यमंत्र्यांचे आयुक्तांना निर्देश !

नागपूर – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज नागपुरात औरंगाबादच्या कचराप्रश्नावर बैठक घेतली. या बैठकीला विधानसभा अध्यक्ष हरिभाऊ बागडे, एमआयएमचे आमदार इम्तियाज जलील आणि भाजपचे पदाधिकारी उपस्थित होते. तसेच औरंगाबाद महापालिकेचे महापौर नंदकुमार घोडेले, सभागृह नेते आणि स्थायी समितीच्या अध्यक्षांनी दांडी मारली.

दरम्यान या बैठकीत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी कचराप्रश्नी कठोर भूमिका घेण्याचे निर्देश आयुक्तांना दिले आहेत.याबाबत कुणाचंही ऐकू नका वेळ पडली तर औरंगाबाद महापालिका बरखास्त करु असे निर्देश त्यांनी दिले आहेत. औरंगाबाद महापालिकेत शिवसेना-भाजपची सत्ता असून शिवसेनेचा महापौर तर भाजपचा उपमहापौर आहे. त्यामुळे या बैठकीला शिवसेनेच्या नेत्यांनी मात्र दांडी मारली असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे.

दरम्यान औरंगाबादच्या कचराप्रश्नावर शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनीही मातौश्रीवर बैठक घेतली. त्यामुळे मातोश्रीवरील बैठकीला शिवसेना नेत्यांनी उपस्थितील लावली होती. या बैठकीत औरंगाबाद कचरा प्रश्न, जल वाहिन्या, बाळासाहेब ठाकरे स्मारक या कामांचा आढावा घेतला असल्याची माहिती आहे.

COMMENTS