मुंबई – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या कार्यालयात कोट्यवधी रुपयांचा चहा घोटाळा झाला असल्याचा आरोप मुंबई काँग्रेसचे अध्यक्ष संजय निरुपम यांनी केला आहे. वर्ष 2017-18 मध्ये चहावर 3 कोटी 34 लाख, 64 हजार 905 रुपये खर्च करण्यात आले असल्याचं निरुपम यांनी म्हटलं आहे. तसेच एवढा चहा कोणी पिऊ शकत नाही यात चहा कमी आणि बील जास्त असून मुख्यमंत्र्यांच्या नाकाखाली हा घोटाळा झाला आहे. त्यामुळे त्याची चौकशी झाली पाहिजे तसं पत्र मुख्यमंत्र्यांना लिहणार असून भाजपला चहावर विशेष प्रेम आहे यावरून दिसत असल्याचंही त्यांनी म्हटलं आहे.
मुख्यमंत्री कार्यालयातील चहाचा खर्च
दर महिन्याला 27 लाख 88 हजार रुपये खर्च
प्रत्येक महिन्यात 5 लाख 57 हजार 748 कप
म्हणजे दर दिवशी 92 हजार 958 रुपये चहावर खर्च केला जातो
दर दिवशी 18 हजार 591 कप चहा प्यायला जातो
दर मिनिटाला पाच रुपये हिशोबाने 64 रुपये खर्च होतो
दर मिनिटाला 12 कप चहा प्यायला जातो
माहितीच्या अधिकारातील माहितीनुसार
वर्ष 2015- 2016 मधील खर्च
57 लाख 99 हजार 156 रुपये खर्च
वर्ष 2016- 2017 मधील खर्च
1 कोटी 20 लाख, 92 हजार 972 खर्च
वर्ष 2017- 2018 मधील खर्च
चहा आणि अल्पोपहारवर 3 कोटी 34 लाख 64 हजार 905 रुपये खर्च
COMMENTS