मुख्यमंत्री उद्धव ठाकरे शेतकऱ्यांच्या बांधावर, 10 लाखांची केली प्रातिनिधिक मदत !

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे शेतकऱ्यांच्या बांधावर, 10 लाखांची केली प्रातिनिधिक मदत !

सोलापूर – मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हे शेतकऱ्यांच्या बांधावर पोहोचले आहेत. ते आज सोलापूर जिल्ह्याच्या दौऱ्यावर आहेत. सोलापूर जिल्ह्यातील पूरपरिस्थिती पाहणी दौऱ्यादरम्यान अक्कलकोट तालुक्यातील बोरी नदी परिसरात अतिवृष्टीमुळे झालेल्या नुकसानीची पाहणी त्यांनी केली. यावेळी त्यांनी नुकसानग्रस्त शेतकऱ्यांशी आणि ग्रामस्थांशी संवाद साधून त्यांना धीर देण्याचा प्रयत्न केला.

एवढच नाही तर त्यांनी तातडीने मदतकार्य करण्यास सुरुवातही केली आहे. नुकसानग्रस्तांना धीर देत 10 लाखांची प्रातिनिधिक मदत दिली आहे.  सांगवी खूर्द येथे नैसर्गिक आपत्तीमुळे पडझड झालेल्या घरांची पाहणी त्यांनी केली. या भागात 150 घरांचे अतोनात नुकसान झाले आहे. पडझड झालेल्या प्रत्येक घराला 95 हजारांची मदत दिली आहे. त्यामुळे मुख्यमंत्र्यांनी पूरग्रस्तांना  प्रातिनिधिक स्वरूपात मदत म्हणून 11 धनादेशांचे वाटप केले आहे.

दरम्यान पूरग्रस्त भागातील मदतकार्य तसेच नुकसान भरपाई देण्यासाठी तात्काळ आवश्यक ते पंचनामे कागदपत्रांची फारशी शहानिशा न करता पूर्ण करण्याचे आदेश मुख्यमंत्र्यांनी प्रशासनाला दिले आहेत.आज सोलापूर जिल्ह्याचा पूरग्रस्त भागांचा दौरा पुर्ण केल्यावर बुधवारी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे उस्मानाबाद जिल्ह्यातील पूरग्रस्त भागाचा दौरा करणार आहेत. आज दिवसभर ते अक्कलकोट, बोरी नदी, रामपूर, बोरी उमरगे या पूरग्रस्त भागांची पाहणी करणार आहेत.

COMMENTS