ब्रेकिंग न्यूज – कॉलेजमध्ये निवडणुका घेण्याचा सरकारी निर्णय जाहीर !

ब्रेकिंग न्यूज – कॉलेजमध्ये निवडणुका घेण्याचा सरकारी निर्णय जाहीर !

मुंबई – राज्यातल्या काँलेज विद्यार्थ्यांसाटी एक गुड न्यूज आहे. गेली अनेक वर्ष बंद असलेल्या काँग्रेलमधील निवडणुकीचा मार्ग आता मोकळा झाला आहे. कॉलेजमधील निवडणुका घेण्याबाबतचा जीआर आज लागू करण्यात आला आहे.  त्यामुळे प्रत्येक कॉलेजमध्ये आता पुढील वर्षभरात निवडणुका होणार आहेत. विशेष म्हणज्ये देशभर सुरू असलेल्या ईव्हीएमच्या वादाच्या पार्श्वभूमीवर या निवडणुका या मतपत्रिकेद्यारे होणार आहेत.

अनेक वर्षांपासून बंद असलेल्या कॉलेजमधील निवडणुका आज होणार उद्या होणार असे अनेद दिवसांपासून सुरू होतं. त्याला एकदाचा मुहुर्त मिळाला आहे. आज सरकारनं याबाबतचा जीआर काढला आहे. कॉलेजमध्ये निवडणुकीत झालेल्या हिंसेच्या पार्श्वभूमीवर निवडणुका बंद करण्यात आल्या होत्या. त्या निवडणुका पुन्हा सुरु करण्याची अनेक विद्यार्थी संघटनांनी मागणी केली होती. आता निपक्षपाती आणि कोणतेही वाद न होता या निवडणुका पार पडण्याची जबाबदारी विद्यापीठांवर सोपवण्यात आली आहे.

COMMENTS