मुंबई – राज्यात कॉलेजमधील निवडणुका घेण्याबाबतचा जीआर आज लागू करण्यात आला आहे. त्यामुळे प्रत्येक कॉलेजमध्ये आता पुढील वर्षभरात निवडणुका होणार आहेत. विशेष म्हणजे देशभर सुरू असलेल्या ईव्हीएमच्या वादाच्या पार्श्वभूमीवर या निवडणुका मतपत्रिकेद्वारे होणार आहेत. या निवडणुका लढवण्यासाठी विद्यार्थी आणि महाविद्यालयांना अटी व नियम लागू करण्यात आले आहेत. या नियमांमध्ये बसणा-या विद्यार्थ्यांनाच निवडणूक लढवता येणार आहे.
निवडणूक लढवण्यासाठी नियम
1)कुलगुरूंसोबत विचारविनिमय करून निवडणूक कार्यक्रम जाहीर करण्यात येईल.
2) महाविद्यालयाचे प्राचार्य किंवा संचालक विद्यार्थी परिषद निवडणुकीसाठी प्राधिकृत अधिकारी असतील, 31 जुलैपूर्वीच निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर करणं बंधनकारक असेल.
3) निवडणुका घेऊन 30 सप्टेंबरपूर्वी विद्यार्थी परिषद गठित करणं आवश्यक.
4) आरक्षित जागांचा निर्णय चिठ्ठी टाकून घेण्यात येईल.
5) पूर्णवेळ प्रवेश घेतलेल्या विद्यार्थ्यांनाच निवडणूक लढवता येईल, एटीकेटी किंवा एकाच वर्गात पुन्हा प्रवेश घेतलेल्या विद्यार्थ्यांना निवडणूक लढवण्यास मनाई आहे.
6) निवडणूक लढवणाऱ्या विद्यार्थ्याचे वय 25 पेक्षा जास्त नसावं.
7) एका विद्यार्थ्याला एकापेक्षा जास्त पदांसाठी निवडणूक लढवता येणार नाही.
8) मतपत्रिकेच्या माध्यमातून मतदान घेण्यात येईल, पसंती क्रमानुसार मतदान आणि मतमोजणी होईल.
9) निवडून येण्यासाठी ठरवलेला मतांचा कोटा पूर्ण करावा लागेल.
10) राजकीय पक्षांना प्रचार करता येणार नाही.
COMMENTS