“काँग्रेसमधील काही वरिष्ठांशी माझे मतभेद, योग्य वेळी निर्णय घेणार !”

“काँग्रेसमधील काही वरिष्ठांशी माझे मतभेद, योग्य वेळी निर्णय घेणार !”

मुंबई – काँग्रेस पक्षातील काही वरिष्ठ नेत्यांशी माझे मतभेद असल्यामुळे योग्य वेळी मी माझी भूमिका जाहीर करणार असल्याचं वक्तव्य माजी वस्त्रोद्योगमंत्री प्रकाश आवाडे यांनी केलं आहे. आवाडे हे सध्या कोणत्या पक्षात आहेत, ते काँग्रेस सोडणार, भाजपत प्रवेश करणार अशी जोरदार चर्चा सध्या राजकीय वर्तुळात सुरु असून याबाबत आपण योग्यवेळी निर्णय घेणार असल्याचं स्पष्टीकरण त्यांनी दिलं आहे. काँग्रेसला सुबुद्धी सुचत नाही तोपर्यंत मी काँग्रेसचे काम करणार नसून याचा अर्थ अर्थ मी राजकारणातून संन्यास घेईल असा होत नसल्याचंही आवाडे यांनी म्हटलं आहे.

दरम्यान आवाडे यांनी यावेळी केंद्र आणि राज्य सरकारववर जोरदार टीका केली असून एकेकाळी वस्त्रनगरी इचलकरंजी वैभवाने झळाळून निघत होती, मात्र आजमितीला येथील वस्त्रोद्योग व्यवसाय लयाला जात असल्याचं ते म्हणाले आहेत. तसेच याला सर्वस्वी केंद्र व राज्य सरकारचे धोरणच जबाबदार असून शासनाने घोषित केलेल्या एकाही आश्वासनाची पूर्तता होत नसल्याने शासनाने यंत्रमागधारक व कामगारांची घोर फसवणूक केली असल्याचा दावाही त्यांनी केला आहे. यंत्रमाग कामगारांसाठी माथाडी बोर्डच्या धर्तीवर कल्याणकारी मंडळ स्थापन करून ते कार्यान्वित करणे आवश्यक आहे. त्यासाठी माझ्या अध्यक्षतेखालील नेमलेल्या समितीने केलेल्या शिफारशींचा स्वीकार सरकारने केला होता. दुर्दैवाने त्यानंतर राज्यात सत्ताबदल झाल्याने हा प्रश्न प्रलंबित राहिला असल्याचंही आवाडे यांनी म्हटलं आहे.

 

COMMENTS