…त्यामुळे केली हार्दिक पटेलवर शाईफेक ! पाहा व्हिडीओ

…त्यामुळे केली हार्दिक पटेलवर शाईफेक ! पाहा व्हिडीओ

भोपाळ – पाटिदार समाजाचा नेता हार्दिक पटेलवर शाईफेक करण्यात आली आहे. मिलिंद गुर्जर या युवकाने मध्य प्रदेशातील उज्जैनमध्ये हार्दिक पटेलवर शाईफेक केली आहे. एका हॉटेलमध्ये हार्दिक पटेल पत्रकार परिषद घेत असताना ही घटना घडली असून या प्रकारानंतर हार्दिक पटेलच्या समर्थकांनी गुर्जरला चांगलाच चोप दिला असल्याची माहिती आहे.

दरम्यान स्वार्थासाठी हार्दिक पटेलने पाटिदार आणि गुर्जर समाजाची फसवणूक केली असल्यामुळेच शाईफेक केली असल्याचं या तरुणानं म्हटलं आहे. हार्दिक पटेल सध्या मध्य प्रदेशच्या दौऱ्यावर असून स्थानिक शेतकऱ्यांशी संवाद साधत आहे. शनिवारी रात्री झालेल्या पत्रकार परिषदेत त्याने व्यापमं घोटाळ्यावरुन शिवराजसिंग चौहान सरकारवर निशाणा साधला असून यादरम्यान त्याच्यावर शाईफेक करण्यात आली आहे.

COMMENTS