मुंबई – औद्योगिक व वाणिज्यिक वीजदर कमी केले जाणार सल्याची माहिती ऊर्जा, नवीन व नवीकरणीय ऊर्जा मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी दिली आहे. तसेच येत्या 2025 पर्यंत राज्यातील सर्वच सुमारे 45 लाख कृषीपंपांना टप्प्याटप्प्याने सौरऊर्जेद्वारे वीजपुरवठा करण्याचे राज्य शासनाचे नियोजन असल्याचं त्यांनी म्हटलं आहे. त्यामुळे कृषीपंपांना दिवसा तसेच पुरेशी व स्वस्त वीज मिळावी ही शेतकरी बांधवांची मुख्य मागणी पूर्ण होणार असल्याचं ते म्हणाले आहेत. ऊर्जेचे संवर्धन व व्यवस्थापनामध्ये उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या राज्यातील विविध संस्थांना पारितोषिक देण्यासाठी कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. त्यादरम्यान ते बोलते होते.
दरम्यान कृषीपंपांसोबतच राज्यातील नळयोजना व उपसा जलसिंचन योजना संपूर्णपणे सौर ऊर्जेवर आणण्याची अंमलबजावणी सुरु असून गावांमधील सार्वजनिक पाणीपुरवठा योजनांचे 7.5 एचपीपर्यंतचे पंप लवकरच सौर पंपांनी बदलण्याचे काम हाती घेण्यात येत असल्याचे बावनकुळे यांनी म्हटलं आहे. राज्यात 14,400 मेगावॉटचे अपांरपरिक ऊर्जा निर्मिती करणारे महाराष्ट्र देशातील पहिले राज्य असून येत्या डिसेंबरपर्यंत हे उद्दिष्ट पूर्ण होणार असल्याचही यावेळी बावनकुळे यांनी म्हटलं आहे.
COMMENTS