“बॉलिवूडबरोबरच राजकारणातही सेक्सची मागणी केली जाते !”

“बॉलिवूडबरोबरच राजकारणातही सेक्सची मागणी केली जाते !”

पाटणा – बॉलिवूडबरोबरच राजकारणातही सेक्सची मागणी आणि ऑफर दिली जाते, असं वक्तव्य शत्रुघ्न सिन्हा यांनी केलं आहे.  सरोज खान आणि रेणुका चौधरी यांचं म्हणणं चुकीचं नसून बॉलिवूडमध्ये आणि राजकारणात काम करण्यासाठी सेक्सची मागणीही होते आणि ऑफरही दिली जाते. पुढे जाण्यासाठी अतिशय जुना आणि यशस्वी ठरलेला हा पर्याय असून सेक्सच्या मागणीचा प्रकार हा मानवाच्या सुरुवातीपासून होतो. तसेच यात खेद करण्यासारखं काहीच नाही, असंही शत्रुघ्न सिन्हा यांनी म्हटलं आहे.

दरम्यान सरोज खान यांचं नृत्यदिग्दर्शनाच्या क्षेत्रात मोठं योगदान असून त्यांनी रेखा, माधुरी दीक्षित आणि दिवंगत अभिनेत्री श्रीदेवी यांचे करिअर चमकवले आहे. त्या कायम मनापासून बोलतात. राजकारणापेक्षा भावनिक गोष्टींवर त्यांचा भर असतो असंही सिन्हा यांनी यावेळी म्हटलं आहे.

COMMENTS