मालेगाव – शिवसेनेचे राज्यमंत्री दादा भुसे यांचा मुलगा अविष्कार भुसेसह तीन जणांविरोधात हत्येचा प्रयत्न केल्याचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मालेगाव पंचायत समितीचे भाजपचे सदस्य लकी खैरनार यांच्यावर जीवघेणा हल्ला केल्याप्रकरणी छावणी पोलिसांनी त्यांच्यावर हा गुन्हा दाखल केला आहे. या तिंघावरही 307, 324 प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
दरम्यान लकी खैरनार यांची प्रकृती स्थिर असून त्यांच्यावर रुग्णालयात उपचार सुरु आहेत. सोमवारी रात्री लकी खैरनार हे घराकडे जात असताना मालेगाव येथील कॅम्पमध्ये त्यांचावर हा हल्ला झाला आहे. तसेच त्यांच्या गीडीचीही तोडफोड करण्यात आली होती. शिवसेनेचे ग्रामविकास राज्यमंत्री दादा भुसे यांच्या मुलानं हा हल्ला केल्याची तक्रार भाजपच्या कार्यकर्त्यांनी दिली होती. त्यानंतर पोलिसांनी हा गुन्हा दाखल केला आहे. राजकीय सुडापायी हा हल्ला केला असल्याचं भाजपच्या कार्यकर्त्यांनी म्हटलं आहे. त्यामुळे मालेगावातील शिवसेना विरुध्द भाजपचा वाद चव्हाट्यावर आल्याचं दिसून येत आहे.
COMMENTS