नवी दिल्ली – लोकसभा निवडणूक संपताच काँग्रेसला मोठा धक्का बसणार असल्याची शक्यता वर्तवली जात आहे. कारण कर्नाटकचे माजी मुख्यमंत्री आणि भाजपचे नेते बी.एस. येडियुरप्पा यांनी मोठं वक्तव्य केलं आहे. काँग्रेसचे २० आमदार कधीही निर्णय घेत भाजपची साथ देऊ शकतात, असा दावा त्यांनी केला आहे. राज्यातील काँग्रेसचे २० आमदार विद्यमान सरकारवर नाराज आहेत. त्यामुळे हे आमदार कोणत्याही क्षणी निर्णय घेऊ शकतात असं येडियुरप्पा यांनी म्हटलं आहे.
दरम्यान कर्नाटकमध्ये काँग्रेस आणि जनता दल सेक्युलर युतीचे सरकार आहे. मात्र भाजपकडून आमदार खरेदी करण्याचे अनेक प्रयत्न करण्यात आल्याचे आरोप काँग्रेस आणि जेडीएसकडून करण्यात आले आहे. त्यात आता येडियुरप्पा यांच्या वक्तव्यामुळे सरकारची चिंता वाढली आहे. वर्तमान सरकारमधील २० आमदार नाराज असून ते भाजपमध्ये प्रवेश करू शकतात. त्यामुळे वेट अन्ड वॉचची भूमिका घेतली आहे. असही येडियुरप्पा यांनी म्हटले आहे. त्यामुळे राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे.
COMMENTS