“विदर्भात काँग्रेस-राष्ट्रवादी पाच जागा जिंकणार असल्याची भाजपाच्या गोटात चर्चा !”

“विदर्भात काँग्रेस-राष्ट्रवादी पाच जागा जिंकणार असल्याची भाजपाच्या गोटात चर्चा !”

मुंबई – विदर्भात काँग्रेस-राष्ट्रवादी पाच जागा जिंकणार असल्याची भाजपाच्या गोटात चर्चा असून आम्ही विदर्भात नऊ जागा जिंकू असा आम्हाला आत्मविश्वास असल्याचा दावा काँग्रेसचे नेते विजय वडेट्टीवार यांनी केला आहे. तसेच नागपीरमध्यो नितीन गडकरी यांचा पराभव निश्चित असल्याचही वडेट्टीवार यांनी म्हटलं आहे.

दरम्यान लोकसभा निवडणुकीचा निकाल अवघ्या काही दिवसांवर येऊन ठेपला आहे. या निकालाच्या पार्श्वभूमीवर राजकीय नेत्यांकडून आपल्याच पक्षाला जास्त जागा मिळतील असा दावा केला जात आहे. काँग्रेसचे नेते विजय वडेट्टीवार यांनी देखील विदर्भात नऊ जागा जिंकू असा आम्हाला आत्मविश्वास असल्याचा दावा केला आहे. त्यामुळे वडेट्टीवार यांचा दावा कितपत खरा ठरणार याचं चित्र 23 मे रोजी स्पष्ट होणार आहे.

COMMENTS