काँग्रेसला धक्का, आणखी एका ज्येष्ठ नेत्याचा पूत्र भाजपच्या वाटेवर ?

काँग्रेसला धक्का, आणखी एका ज्येष्ठ नेत्याचा पूत्र भाजपच्या वाटेवर ?

मुंबई – आगामी विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर काँग्रेसला मोठा धक्का बसणार असल्याचं दिसत आहे. कारण का‌ँग्रेसचे ज्येष्ठ नेते आणि नंदूरबारमधील माजी खासदार असलेले माणिकराव गावीत यांचे चिरंजीव भरत गावीत हे भाजपच्या वाटेवर असल्याची माहिती आहे. तसेच भरत गावित यांना नवापूर विधानसभा मतदारसंघातून भाजपकडून उमेदवारी दिली जाणार असल्याची चर्चा आहे. गावित यांचा या मतदारसंघात मोठा जनसंपर्क असल्यामुळे याठिकाणी काँग्रेसला मोठा धक्का बसणार असल्याचं बोललं जात आहे.

दरम्यान माणिकराव गावीत यांचे चिरंजीव भरत गावित हे नंदूरबार लोकसभा मतदारसंघातून निवडणूक लढण्यास इच्छुक होते. परंतु काँग्रेसने त्यांना उमेदवारी दिली नाही. त्यांना डावलून पक्षाकडून आमदार अ‍ॅड़ के़सी़ पाडवी यांना उमेदवारी दिली होती. तेंव्हापासून ते पक्षावर नाराज आहेत. तसेच कार्यकर्त्यांचा दबाव पाहता ते भाजपमध्ये जाणार असल्याची चर्चा आहे. माजी केंद्रीयमंत्री असलेल्या माणिकराव गावीत यांचा मतदारसंघात मोठा जनसंपर्क आहे. सर्वांना सोबत घेत काम करण्याची पद्धत यामुळे तळागाळातील कार्यकर्ते त्यांच्या संपर्कात आहेत. त्यामुळे भाजपकडून भरत गावित यांना नवापूर विधानसभा मतदारसंघातून उमेदवारी दिली जाणार असल्याची चर्चा आहे.

COMMENTS