काँग्रेस-भाजपमध्ये फोडाफोडी, एकमेकांचे बडे नेते गळाला?

काँग्रेस-भाजपमध्ये फोडाफोडी, एकमेकांचे बडे नेते गळाला?

नवी दिल्ली – आगामी लोकसभा निवडणुकीच्या तोंडावर राजकीय पक्षामध्ये फोडाफोडीचे राजकारण सुरु आहे. यामध्ये काँग्रेस आणि भाजप आघाडीवर असल्याचं दिसत आहे. गुजरातमधील भाजप आणि काँग्रेस एकमेकांचे बडे नेते गळाला लावण्याच्या तयारीत आहेत. काँग्रेस आमदार अल्पेश ठाकोर, ललित वसोया, सोमभाई पटेल हे नेते काँग्रेसचा राजीनामा देण्याच्या तयारीत असल्याची माहिती आहे.  काँग्रेसच्या या आमदारांना मंत्रीपदही दिले जाण्याची शक्यता आहे.  तसेच भारत ठाकोर, धवल झाला हेही काँग्रेसला रामराम करण्याच्या तयारीत असल्याची माहिती आहे. परंतु याबाबत या नेत्यांकडून अधिकृत दुजोरा मिळालेला नाही.

दरम्यान याठिकाणी भाजपलाही मोठा धक्का बसला असून नारायण पटेल काँग्रेसमध्ये जाण्याची शक्यता वर्तवली जात आहे. गुजरातमध्ये आगामी लोकसभा निवडणुकीत कोणाला स्पष्ट बहुमत मिळणार नाही, असा अंदाज वर्तविण्यात येत आहे. त्यामुळे एकमेकांचे नेते, आमदार, खासदार फोडण्याचा या दोन्ही पक्षांमध्ये प्रयत्न सुरु असल्याचं दिसत आहे.

COMMENTS