मुंबई – येत्या 30 डिसेंबरला महाविकास आघाडी सरकारचा मंत्रिमंडळ विस्तार होणार आहे.
परंतु हा मंत्रिमंडळ विस्तार होण्याआधी काँग्रेसमधील नाराजी नाट्य समोर आलं आहे. खातेवाटपात काँग्रेसला ग्रामीण भागाशी संबंधित एकही महत्त्वाचं खातं मिळालेलं नाही. कृषी, ग्रामविकास, सहकार आणि जलसंपदा या चार महत्वाच्या खात्यापैकी एकही खातं काँग्रेसकडं नाही. त्यामुळे काँग्रेस नेत्यांमध्ये नाराजी असल्याची चर्चा आहे. त्यामुळे काँग्रेसची नाराजी कशी दूर करणार हे पाहण गरजेचं आहे.
दरम्यान या मंत्रिमंडळ विस्तारात शिवसेनेचे १३, राष्ट्रवादीचे १३ तर काँग्रेसचे १० मंत्री शपथ घेणार आहेत.या विस्तारात नव्या ३६ मंत्र्यांचा शपथविधी होणार आहे. राज भवनाऐवजी विधान भवनात हा शपथविधी पार पडणार आहे. या शपथविधी सोहळ्याला मंत्र्यांचे नातेवाईक, कार्यकर्ते, आमदार तसंच राजकीय नेते असा मोठा लवाजमा उपस्थित राहणार असल्यानं सुरक्षेच्या दृष्टीनं हा बदल करण्यात आला आहे.
COMMENTS