प्रदेश काँग्रेसकडून राज्यसभेसाठी दोन नावांची शिफारस !

प्रदेश काँग्रेसकडून राज्यसभेसाठी दोन नावांची शिफारस !

मुंबई –  येत्या 23 मार्चरोजी होणा-या राज्यसभेच्या निवडणुकीसाठी प्रदेश काँग्रेसकडून राज्यसभेसाठी दोन नावांची शिफारस करण्यात आली आहे. राज्यसभेसाठी दोन नावं अखिल भारतीय काँग्रेस कमिटीकडे पाठवण्यात आली असून एक नाव रत्नाकर महाजन यांचे आहे, तर दुसरे नाव अजून समजू शकलेले नाही. तसेच काँग्रेसच्या दोन जागा रिक्त झाल्या असल्या तरी सध्याचे पक्षाचे विधानसभेतील संख्याबळ पाहता त्यांचा एकच उमदेवार निवडून येऊ शकतो. त्यामुळे पक्षातर्फे एकच नाव निश्चित केलं जाणार असल्याचंही बोललं जात आहे.

दरम्यान यापूर्वी राष्ट्रवादी काँग्रेसकडून वंदना चव्हाण यांचं नाव कायम ठेवलं असून शिवसेनेकडून अनिल देसाई यांना पुन्हा संधी दिली आहे.तर  भाजपकडून तीन नावं निश्चित कऱण्यात आली आहेत. यामध्ये प्रकाश जावडेकर, धर्मेंद्र प्रधान आणि नारायण राणे या तिघांची नावं निश्चित करण्यात आल्याची माहिती आहे. 23 मार्चरोजी देशभरातून 58 जागांसाठी निवडणूक घेण्यात येणार आहे. तर राज्यतील सहा जागांवर ही निवडणूक पार पडणार आहे. या सहा जागांसाठी होणाऱ्या निवडणुकीत संख्याबळानुसार भाजपचे तीन, शिवसेना, काँग्रेस आणि राष्ट्रवादीचा प्रत्येकी एक उमेदवार निवडून येऊ शकतो.

 

COMMENTS