शिवसैनिकांनो उद्धवजींचा वाढदिवसही तिथीप्रमाणेच साजरा करा – नितेश राणे

शिवसैनिकांनो उद्धवजींचा वाढदिवसही तिथीप्रमाणेच साजरा करा – नितेश राणे

मुंबई – काँग्रेसचे आमदार नितेश राणे यांनी पुन्हा एकदा शिवसेनेवर जोरदार टीका केली आहे. छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती तिथीप्रमाणे साजरी करण्याच्या विषयावरुन त्यांनी शिवसेनेवर टीका केली आहे. शिवसैनिकांना खास विनंती, ज्यांना आपण शिवाजी महाराजांपेक्षाही मोठे मानता, ज्यांचा फोटो महाराजांच्या वर लावता त्या उद्ध्वजींचा वाढदिवस यावर्षी तिथीप्रमाणे 14 ऑगस्टला येत आहे. न विसरता साजरा करा, असं ट्वीट नितेश राणे यांनी केलं आहे. दरवर्षी शिवसेनेकडून तिथीप्रमाणे शिवाजी महाराजांची जयंती साजरी केली जाते. याला विरोध करत नितेश राणे यांनी हे ट्वीट केलं आहे.

दरम्यान जगभरात तमाम शिवभक्‍त 19 फेब्रुवारीला तारखेनुसार छत्रपती शिवाजी महाराज यांची जयंती मोठ्या उत्साहाने साजरी करतात. मात्र, शिवसेनेनी तिथीचा घोळ घालून वेगळी जयंती साजरी करण्याच्या घाट घातलेला आहे. हा अवमान यापुढे आम्ही सहन करणार नाहीत. त्यांनी तत्काळ यावर पडदा टाकत दुसरी जयंती बंद करावी, अन्यथा शिवसेना नेत्यांच्याही वर्षभरातच तिथीनुसारच जयंती साजरी करू, असा इशारा आमदार नितेश राणे यांनी काही दिवसांपूर्वीच दिला होता.

COMMENTS