नवी दिल्ली – लोकसभा निवडणुकीसाठी काँग्रेसनं आपल्या दोन उमेदवारांची यादी जाहीर केली आहे. या यादीत उत्तर प्रदेशमधील वाराणसी या लोकसभा मतदारसंघातून प्रियंका गांधी यांच्याऐवजी अजय राय यांना उमेदवारी देण्यात आली आहे. त्यामुळे अजय राय यांचा सामना थेट पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याशी होणार आहे. अजय राय हे २०१४ मध्येही मोदींविरोधात निवडणुकीच्या रिंगणात उतरले होते. त्यामुळे नरेंद्र मोदींविरोधात प्रियंका गांधी या निवडणुकीच्या रिंगणात उतरतील या चर्चेला अखेर पूर्णविराम मिळाला आहे.
Congress Central Election Committee announces the next list of candidates for the ensuing elections to the Lok Sabha from Uttar Pradesh. pic.twitter.com/zyol8wPd06
— Congress (@INCIndia) April 25, 2019
दरम्यान चकाँग्रेस प्रियंका गांधी यांना थेट मोदींविरोधात उमेदवारी देणार, अशी चर्चा रंगली होती. मार्च महिन्यात प्रियंका गांधी यांनी उत्तर प्रदेशचा दौरा केला होता. त्यावेळी प्रियंका गांधी यांनी सोनिया गांधी यांचा मतदारसंघ असलेल्या रायबरेलीतून निवडणूक लढवावी, अशी विनंती काँग्रेस कार्यकर्त्यांनी केली होती. यावर प्रियंका गांधी यांनी ‘वाराणसीतून निवडणूक का लढवू नये?’ असा प्रतिप्रश्न केला होता. त्यामुळे प्रियंका गांधी या वाराणसीतून लोकसभा निवडणूक लढवतील अशी चर्चा होती. परंतु पुन्हा एकदा राहुल गांधी यांनी अजय राय यांना उमेगवारी दिली आहे.
COMMENTS