व्यंगचित्रातून काँग्रेसचे सरकारला फटकारे !

व्यंगचित्रातून काँग्रेसचे सरकारला फटकारे !

राज्य आणि केंद्रातल्या सरकाविरोधात सर्वच विरोधी पक्ष आक्रमक झाले आहेत. सरकावर चौफेर केला जातोय. कोणी भाषणाच्या माध्यमातून, कोणी संपादकीयच्या माध्यमातून, तर कोणी व्यंगचित्राच्या माध्यमातून सरकावर हल्लाबोल करत आहेत. राज ठाकरे यांनी गेल्या काही दिवसांपासून व्यंगचित्रातून सरकारला फटकारे लगावले होते. आता काँग्रेसनंही असंच एक व्यंगचित्र प्रसिद्ध करुन सरकावर टीकास्त्र सोडलंय.

राज्य सरकारमधील विविध मंत्र्यांची भ्रष्टाचाराची प्रकरणे विरोधी पक्षांनी पुराव्यासह अनेकदा उघड केली. या प्रकरणांमध्ये भ्रष्टाचार सिध्द होत असतानाही राज्याचे मुख्यमंत्री मात्र सातत्याने जाणिवपूर्वक दुर्लक्ष करून भ्रष्ट मंत्र्यांना क्लिन चीट देत असतात असा आरोप करत काँग्रेसनं व्यंगचित्रातून सरकारला फटकारलं आहे. सहकारमंत्री सुभाष देशमुखांना मुख्यमंत्र्यांनी अगोदरच दिलेली क्लिनचीट व आता बाळगलेले मौन या सरकारचा दांभिकपणा आणि भ्रष्टाचाराला असणारा पाठिंबा अधोरोखित करणारे आहे. भ्रष्टाचाराच्या पर्वतावर उभे राहून पारदर्शकतेच्या गप्पा मारणा-या भाजप सरकार आहे असा टोलाही काँग्रेसनं  लगावला आहे.

COMMENTS