दिल्ली – गुजरात विधानसभेच्या पहिल्या टप्प्यातील मतदान शनिवारी पार पडलं. हे पहिल्या टप्प्यातील मतदान पार पडतं न पडतं तोच काँग्रेसच्या नावाचं एक पत्र सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. हे पत्र काँग्रेसच्याच नेत्याचं असल्याचं बोललं जात असून त्यात चक्क काँग्रेसच्या पक्षाच्या पराभवाचीच घोषणा करण्यात आली आहे. तसेच हे पत्र काँग्रेस उपाध्यक्ष राहुल गांधी यांच्या नावाने लिहिल्याचा दावा करण्यात येत आहे.
गुजरातमधील पहिल्या टप्प्यातील मतदान काल पार पडलं आहे. तर दुस-या टप्प्यातील मतदान 14 डिसेंबरला होणार आहे. या दोन्ही टप्प्यातील मतदानाचा निकाल 18 डिसेंबरला लागणार आहे. परंतु त्यापूर्वीच काँग्रेसच्या पराभवाची घोषणा करणार हे पत्र व्हायरल होत आहे.
या पत्रामध्ये प्रदेशाध्यक्ष भरत सिंह सोलंकी यांच्या नावाचा उल्लेख करण्यात आला आहे. परंतु हे पत्र बनावट असल्याचा दावा काँग्रेसच्या नेत्यांनी केला आहे. त्यामुळे सोशल मीडियावर सध्या निवडणुकीपेक्षा या पत्राचीच जास्त चर्चा आहे.
COMMENTS