आरएसएसनंतर आता काँग्रेसचाही ड्रेस कोड बदलणार  !

आरएसएसनंतर आता काँग्रेसचाही ड्रेस कोड बदलणार !

मुंबई – काही दिवसांपूर्वीच राष्ट्रीय स्वयंसेवक संघानं आपल्या ड्रेस कोडमध्ये बदल केला असून हाफ पॅन्ट ऐवजी ट्राउजर ठेवण्यात आलं आहे. त्यानंतर आता काँग्रेसनही आपल्या ड्रेस कोडमध्ये बदल करण्याचा निर्णय घेतला असून काँग्रेसच्या सेवा दलाचा पोशाख बदलण्यात आला आहे. पांढरा कुर्ता आणि जीन्स असा नवीन पोशाख ठेवण्यात आला आहे. ९ जुलैपासून नवीन ड्रेस कोड लागू होणार असून यापूर्वी काँग्रेस सेवा दलाचा पोषाख पांढरा कुर्ता आणि पायजमा असा होता. त्यानंतर यामध्ये बदल करण्यात आला आहे.

दरम्यान काँग्रेसचे अध्यक्ष राहुल गांधी पांढरा कुर्ता आणि जीन्स घालतात, त्यांचेच अनुकरण सेवा दलाने करायचे ठरवले असल्याची माहिती आहे. त्यामुळे 9 जुलैपासून काँग्रेस सेवा दलाचे कार्यकर्ते हे नवीन ड्रेस कोडमध्ये पहायला मिळणार आहे. दरम्यान राहुल गांधी हे काँग्रेसचे अध्यक्ष झाल्यापासून पक्षात मोठे बदलाचे वारे वाहू लागले आहेत. त्याचच एक उदाहरण म्हणजे बदलण्यात आलेल्या काँग्रेसच्या सेवा दलाचा ड्रेस कोड होय.

 

COMMENTS