कर्नाटक – काँग्रेस सरकार पडणार? फडणवीसांच्या मध्यस्थीने नाराज आमदार शाहांच्या भेटीला !

कर्नाटक – काँग्रेस सरकार पडणार? फडणवीसांच्या मध्यस्थीने नाराज आमदार शाहांच्या भेटीला !

नवी दिल्ली  कर्नाटकमधील काँग्रेस-जेडीएसचं सरकार पडणार असल्याची जोरदार चर्चा राजकीय वर्तुळात सुरु झाली आहे. हे सरकार पाडण्यासाठी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मध्यस्थी केली असल्याची माहिती आहे. काँग्रेसचे नाराज आमदार रमेश जारकीहोळी यांंनी भाजप अध्यक्ष अमित शाहंची आज भेट घेतली आहे. या भेटीसाठी देवेंद्र फडणवीस यांनी मध्यस्थी केली आहे. त्यामुळे जारकीहोळी हे भाजपमध्ये प्रवेश करतील अशी शक्यता वर्तवली जात आहे.

दरम्यान गेली अनेक दिवसांपासून पक्षावर नाराज असलेले जारकीहोळी हे भाजपच्या संपर्कात होते. त्यांनी अनेकवेळा पक्षाविरोधात टीका केली होती. त्यामुळे त्यामुळे राहुल गांधी यांच्या आदेशावरून जारकोहळी यांना मंत्रिमंडळातून डच्चू देण्यात आला. त्यामुळे नाराज झालेले जारकोहळी गेल्या काही दिवसांपासून राज्यातील नाराज आमदारांची मोट बांधत आहेत. काँग्रेसमधील १८, जेडीएसचे २ आणि अपक्ष २ असे एकूण २२ आमदार त्यांच्या संपर्कात असल्याची माहिती आहे. त्यामुळे जारकीहोळी यांनी भाजपाच प्रवेश केला चर काँग्रेसला मोठा धक्का बसणार आहे.

COMMENTS