काँग्रेसच्या नेत्यानं गावक-यांसमोर घासलं नाक !

काँग्रेसच्या नेत्यानं गावक-यांसमोर घासलं नाक !

नवी दिल्ली – काँग्रेसच्या नेत्यानं गावक-यांसमोर नाक घासलं असल्याची घटना समोर आली आहे. ही घटना राजस्थानमधल्या डूंगरपुरच्या सागवाडामध्ये घडली आहे. या नेत्यानं अशी काही चूक केली की गावकऱ्यांनी त्यांना जाहीर माफी मागण्यासाठी भाग पाडलं. काँग्रेस नेता आणि माजी जिल्हाप्रमुख भगवतीलाल रोत एका सभेसाठी चालले होते. तेव्हा त्यांच्याकडून एक चूक झाली आणि त्याची माफी मागण्यासाठी काँग्रेसच्या या नेत्याने गावकऱ्यांसमोर नाक घासलं आहे.

सभेला जाताना त्यांच्या गाडीमुळे रस्त्यावरील लोकांच्या अंगावर चिखल उडाला होता. पण त्यांनी या सगळ्याकडे दुर्लक्ष करुन तिथून निघून गेले.गावकऱ्यांना त्यांचा असा झालेला अपमान काही सहन झाला नाही आणि त्यांनी तब्बल 2 किलोमीटरपर्यंत रोत यांच्या गाडीचा पाठलाग केला आणि त्यांना नाक घासून माफी मागण्यास भाग पाडलं.

COMMENTS