काँग्रेसला धक्का, अनेक कार्यकर्त्यांसह काँग्रेसच्या ‘या’ माजी आमदाराचा शिवसेनेत प्रवेश!

काँग्रेसला धक्का, अनेक कार्यकर्त्यांसह काँग्रेसच्या ‘या’ माजी आमदाराचा शिवसेनेत प्रवेश!

मुंबई – काँग्रेसला जोरदार धक्का बसला असून
अनेक कार्यकर्त्यांसह काँग्रेसच्या माजी आमदारानं आज शिवसेनेत प्रवेश केला आहे. सोलापूर दक्षिण येथील काँग्रेसचे माजी आमदार दिलीप माने यांनी आज शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या हस्ते शिवबंधन बांधून शिवसेनेत प्रवेश केला आहे. मातोश्री येथे हा पक्षप्रवेश सोहळा पार पडला. सोलापुरातील अनेक गावांत दिलीप माने समर्थकांची सत्ता आहे. त्यांच्या शिवसेना प्रवेशामुळे शिवसेनेची सोलापूर जिल्ह्यात मोठी ताकद वाढली असल्याचं दिसत आहे.

दरम्यान माने यांच्यासोबत जवळपास तीन हजार कार्यकर्त्यांनी शिवसेनेत प्रवेश केला आहे. सोलापूर शहरातून काल चाळीस एसटी बसेस तसेच साठ खाजगी अशी शंभर वाहने मुंबईत आली आहेत. कार्यकर्त्यांनी खचाखच भरलेल्या या वाहनांना भगवा झेंडा दाखवण्यात आला आहे.

तसेच आज सोलापूर जिल्ह्यातील बार्शी मतदारसंघाचे विद्यमान आमदार दिलीप सोपल हे सुद्धा शिवसेनेचा भगवा हाती घेणार आहेत. कालच सोपल यांनी आपला राजीनामा विधानसभा अध्यक्षांकडे सोपवला आहे. आज ते शिवसेनेत प्रवेश करणार आहेत. त्यामुळे सोलापुरात काँग्रेस-राष्ट्रवादीला मोठा धक्का बसला असल्याचं दिसत आहे.

COMMENTS