मुंबई – काँग्रेसचे बंडखोर आमदार अब्दुल सत्तार यांनी आज शिवसेनेत प्रवेश केला आहेत. शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या उपस्थितीत मातोश्रीवर सत्तारांनी शिवबंधन बांधले. लोकसभा निवडणुकांच्या आधी सत्तार यांनी मुख्यमंत्र्यांची भेट घेतली होती. त्यामुळे ते भाजपमध्ये जाणार का अशा चर्चांणा उधान आलं होतं.परंतु भाजपमधील स्थानिक नेत्यांनी त्यांच्या प्रवेशाला विरोध केल्यामुळे सत्तार यांनी आज अखेर शिवसेनेत प्रवेश केला आहे. यावेळी उद्धव ठाकरे यांनी अब्दुल सत्तार यांना सिल्लोडची उमेदवारीही जाहीर केली असल्याची माहिती आहे.
दरम्यान दोन दिवसांपूर्वी औरंगाबाद जिल्ह्यातील सिल्लोडमध्ये पोहोचलेल्या मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या महाजनादेश यात्रेत सत्तार यांनी उपस्थिती लावली होती. एवढच नाही तर आमदार अब्दुल सत्तार हे यात्रेच्या रथावर पहायला मिळाले होते. स्वत: मुख्यमंत्र्यांनी त्यांना हात देऊन रथात घेतले होते. त्यामुळे पुन्हा एकदा सत्तार यांच्या भाजप प्रवेशाची चर्चा रंगली होती. परंतु स्थानिक नेत्यांचा वाढता विरोध पाहता सत्तार यांनी आज शिवसेनेत प्रवेश केला आहे.
COMMENTS