…म्हणून भाजपमध्ये जाणे योग्य नाही – उदयनराजे भोसले

…म्हणून भाजपमध्ये जाणे योग्य नाही – उदयनराजे भोसले

सातारा – अनेक दिवसांपासून भाजपचे लोक पक्ष प्रवेशासाठी माझ्या मागे लागले आहेत. भाजपाची वाटचाल सध्या जोरात सुरू आहे. पण प्रत्येक नाण्याला दोन बाजू असतात, भाजपाच्या एकंदरीत कामामुळे सर्वसामान्य लोक त्रासले आहेत. कामगारांच्या नोकऱ्या जात आहेत कंपन्या बंद पडत आहेत. मागील अनेक दिवसांपासून भाजपाचे लोक पक्ष प्रवेशासाठी माझ्या मागे लागले आहेत. परंतु सत्ता भाजपकडे आहे म्हणून भाजपमध्ये जाणे योग्य नसल्याचं वक्तव्य राष्ट्रवादी काँग्रेसचे खासदार उदयनराजे भोसले यांनी केलं आहे.

दरम्यान, गेल्या चार-पाच वर्षात साताऱ्यात विकास कामे झाली. परंतु सर्वांनी पाठिंबा दिल्यामुळेच मी टिकलो. मागील काळात आडवा पाणी जिरवा असे राजकारण झाले. ईव्हीएम मशीन बाबत मी बोललो परंतु बाकीचे कोणी बोलले नाही. राष्ट्रवादीबद्दलची नाराजीही उदयनराजेंनी यावेळी बोलताना व्यक्त केली. ‘मध्यंतरी माझ्यावर गुन्हे दाखल झाले. त्यात खंडणीचा गुन्हाही दाखल करण्यात आला. हे सर्व होत असताना राष्ट्रवादीचे नेते काही बोलत नव्हते. पक्षातील कोणीही मला विचारले नाही. असे असताना राष्ट्रवादीबरोबर कशासाठी राहायचे. जर राष्ट्रवादी नेत्यांना आवर घालत नसेल तर मी काय समजायचे?’ असा सवाल उदयनराजेंनी उपस्थित केला आहे.

COMMENTS