काँग्रेसमधील तरुण चेहरा अशी ओळख असलेल्या ‘या’ नेत्यानं केला शिवसेनेत प्रवेश!

काँग्रेसमधील तरुण चेहरा अशी ओळख असलेल्या ‘या’ नेत्यानं केला शिवसेनेत प्रवेश!

चंद्रपूर – काँग्रेसमधील तरुण चेहरा अशी ओळख असलेल्या नेत्यानं आज शिवसेनेत प्रवेश केल्यामुळे काँग्रेसला मोठा धक्का बसला आहे. जिल्हा मध्यवर्ती बँकेचे अध्यक्ष मनोहर पाऊणकर यांनी आपल्या हातात शिवबंधन बांधले असून काँग्रेस पक्षातील तरुण चेहरा अशी त्यांची ओळख होती. मुंबईत मातोश्रीवर पक्षप्रमुख उध्दव ठाकरे यांच्या उपस्थितीत त्यांनी आज शिवसेनेत प्रवेश केला आहे. चंद्रपूर नगर पालिका अध्यक्ष, बाजार समिती सभापती आदी पदे भूषवून सध्या जिल्हा बँकेचे ते अध्यक्ष आहेत.

दरम्यान जिल्ह्यातील शिवसेनेच्या वाट्याला येणारी संभाव्य वरोरा विधानसभेची जागा मनोहर पाऊणकर यांना दिली जाण्याची शक्यता आहे. त्यामुळे विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर जिल्ह्यात काँग्रेसला मोठा धक्का बसला असून याठिकाणी शिवसेनेची मोठी ताकद वाढली असल्याचं दिसत आहे.

COMMENTS