कर्नाटकातील काँग्रेसचे तीन आमदार भाजपच्या संपर्कात, काँग्रेस नेत्याचा आरोप !

कर्नाटकातील काँग्रेसचे तीन आमदार भाजपच्या संपर्कात, काँग्रेस नेत्याचा आरोप !

कर्नाटक – कर्नाटकातील काँग्रेसचे तीन आमदार भाजपच्या संपर्कात असल्याचा आरोप काँग्रेसच्या नेत्यानं केला आहे. तसेच हे तीन आमदार मुंबईतील एका हॉटेलमध्ये भाजपा नेत्यांसोबत आहेत असा दावा कर्नाटकचे जलसिंचन मंत्री शिवकुमार यांनी केला आहे. जेडीएस-काँग्रेस सरकार पाडण्यासाठी भाजपाकडून ‘ऑपरेशन लोटस’ सुरु असल्याचंही त्यांनी म्हटलं आहे.तसेच आमच्या आमदारांना काय-काय प्रलोभने दाखवली जात आहेत त्याची आम्हाला पूर्ण कल्पना आहे असंही शिवकुमार यांनी म्हटलं आहे.

दरम्यान भाजपाकडून जी कारस्थान सुरु आहेत त्याची सर्व आमदारांनी मुख्यमंत्र्यांना माहिती दिली आहे. त्यांनी सिद्धारामय्या यांना सुद्धा सांगितले. मुख्यमंत्र्यांनी वेट अँड वॉचचे धोरण स्वीकारले आहे. मी त्यांच्याजागी असतो तर २४ तासात सर्व काही उघड केले असते असंही शिवकुमार यांनी म्हटलं आहे.

COMMENTS