कोल्हापूर – आगामी विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर काँग्रेसला आणखी एक धक्का बसला असून कोल्हापुरातील काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष प्रकाश आवाडे यांनी आपल्या जिल्हाध्यक्ष पदाचा आणि
काँग्रेसच्या प्राथमिक सदस्यत्वाचा राजीनामा काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष बाळासाहेब थोरात यांच्याकडे सोपवला आहे. आवाडे यांनी आगामी विधानसभा निवडणूक अपक्ष म्हणून इचलकरंजी विधानसभा मतदारसंघरातून लढविण्याची घोषणा केली आहे.
दरम्यान प्रकाश आवाडे यांच्यासह त्याचे वडील
माजी खासदार व माजी उद्योग राज्य मंत्री कलाप्पा आवाडे, त्यांचे चिरंजीव व जिल्हा परिषद सदस्य राहुल आवाडे यांनी काँग्रेस पक्षाला सोडचिठ्ठी दिली आहे.
कोल्हापूर जिल्ह्यातील काँग्रेसचे वजनदार घराणे म्हणून आवाडे कुटुंबाकडे पाहिले जाते. सुमारे पाच दशके त्यांनी जिल्ह्याच्या राजकारणावर दबदबा ठेवला होता. कलाप्पा आवाडे यांनी नगराध्यक्ष, आमदार, मंत्री, दोन वेळा खासदार अशी पदे भूषवली आहेत. प्रकाश आवाडे हे चार वेळेस आमदार तर दोन वेळा मंत्रिपदावर होते. याशिवाय त्यांच्या पत्नी किशोरी आवाडे या इचलकरंजीच्या सर्वाधिक सात वर्षे नगराध्यक्ष होत्या. त्यामुळे आवाडे कुटुंबियांनी पक्षाला सोडचिठ्ठी दिल्यामुळे याठिकाणी काँग्रेसला मोठा धक्का बसला असल्याचं दिसत आहे.
COMMENTS