बंगळूरु – एका काँग्रेस नेत्यानं महानगरपालिकेच्या आवारात पेट्रोल टाकून ते पेटवून देण्याची धमकी दिली असल्याची धक्कादाय घटना घडली आहे. नारायणस्वामी असं या नेत्याचं नाव असून त्यांनी सोमवारी महापालिकेच्या आवारात राडा केला असल्याचं दिसून आलं आहे. याबाबतचा व्हिडीओ व्हायरल झाला असून नारायणस्वामी यांनी बृहट बंगळूरु महानगरपालिकेच्या आवारात पेट्रोल टाकून महापालिकेला पेटवून देण्याची धमकी दिली आहे.
https://twitter.com/ANI/status/965822351010123776
दरम्यान नारायणस्वामी हे केआर पुरम लोकसभा मतदारसंघातील काँग्रेस ब्लॉकचे अध्यक्ष असून त्यांनी बीबीएमपी या महापालिकेच्या आवारात पेट्रोल टाकल्याची घटना घडली आहे. एवढच नाही तर त्यांनी महापालिकेला आग लावून देण्याची धमकी अधिका-यांना दिली आहे. दरम्यान नारायणस्वामी हे मुख्यमंत्री दिद्धरामय्या यांचे निकटचे सहकारी असून त्यांनी हे कृत्य का केलं हे अजून तरी अस्पष्ट आहे.
COMMENTS