नवी दिल्ली – आगामी लोकसभा निवडणुकीसाठी काँग्रेसने आपली तिसरी उमेदवारांची यादी जाहीर केली आहे. तेलंगणातून आठ, आसाममधून पाच, मेघालयातून दोन, उत्तर प्रदेश सिक्किम आणि नागालँडमधून प्रत्येकी एक-एक उमेदवाराचे नाव जाहीर करण्यात आलं आहे.
दरम्यान यापुर्वी काँग्रेसने लोकसभा निवडणुकीसाठी 21 उमेदवारांची दुसरी यादी जाहीर केली होती. यामध्ये महाराष्ट्रातील पाच उमेदवारांचा समावेश आहे. नागपुरातून नाना पटोले यांना उमेदवारी देण्यात आली आहे. यासोबतच गडचिरोली, मुंबई उत्तर मध्य, दक्षिण मुंबई आणि सोलापूर या मतदारसंघांसाठीही उमेदवार जाहीर करण्यात आले आहेत.
The Congress Central Election Committee announces the third list of candidates for the ensuing elections to the Lok Sabha. pic.twitter.com/h65DyWmcZH
— Congress (@INCIndia) March 15, 2019
COMMENTS