चंद्रपूर – लोकसभा निवडणुकीत मोठा पराभव झाल्यानंतर काँग्रेसमधील अनेक नेत्यांनी पक्षाला सोडचिठ्ठी दिली. त्यामुळे विधानसभा निवडणुकीतही पक्षाला धक्का बसणार असल्याचं बोललं जात आहे. अशातच आता पक्षातील अंतर्गत कलह चव्हाट्यावर आला आहे. विधान परिषदेचे विरोधीपक्ष नेते विजय वडेट्टीवार आणि नाना पटोले यांच्यातील संघर्ष उफाळून आल्यामुळे ब्रम्हपुरी येथे बुधवारी होणारी ‘महापर्दाफाश’ सभा रद्द करण्यात आली आहे.
दरम्यान महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीसाठी काँग्रेसने नुकतीच आपली निवड समिती जाहीर केली. पण या समितीत विरोधीपक्ष नेते विजय वडेट्टीवार यांना स्थान दिलं नसल्यामुळे ते पक्षावर नाराज आहेत. त्यांनी याबाबत आपली मनातील खदखद व्यक्त केली होती. आता केंद्रीय उमेदवार छाननी समितीची बैठक असल्याचे कारण देत विजय वडेट्टीवार यांनी आपल्या मतदारसंघात होणारी महापर्दाफाश यात्रा रद्द केली आहे. त्यामुळे ‘महापर्दाफाश’ सभा रद्द होण्यामागे विजय वडेट्टीवार यांची खेळी असल्याची चर्चा सुरू आहे.
COMMENTS