लातूर – राज्यात सध्या कॅंग्रेसचे प्रदेशाध्यक्ष बदलाबाबत चर्चा सुरू आहे. लोकसभा निवडणुकीनंतर पराभवाची जबाबदारी स्विकारून अशोक चव्हाण यांनी प्रदेशाध्यक्ष पदाचा राजीनामा दिला. अनेक कॅंग्रेसचे नेते भाजप व शिवसेनेत गेल्याने पक्ष कठी काळात काम करीत होता. त्यावेळी बाळासाहेब थोरात यांच्यावर प्रदेशाध्यक्ष पदाची जबाबदारी देण्यात आली.
विधानसभा निवडणुकीनंतर राज्यात काॅंग्रेस, राष्ट्रवादी व शिवसेना या तीन पक्षांचे सरकार अस्तित्वा आले. यावेळी काॅंग्रेस विधीमंडळाचे नेते म्हणून बाळासाहेब पाटील यांच्यावर जबाबदारी देण्यात आली. तसेच त्यांच्याकडे सध्या महसूलमंत्री पदही आहे. अशा प्रकारे त्यांच्यावर तीन पदांच्या जबाबदाऱ्या असल्याने त्यांच्याकडील प्रदेशाध्यक्ष पद कमी करण्यात यावी, अशी मागणी होऊ लागली.
त्यानुसार मागील आठवड्यात प्रदेशाध्यक्ष बाळासाहेब थोरात यांनी दिल्लीत दोन दिवस पक्षक्षेष्ठींची भेट घेऊन राजीनामा दिल्याची चर्चा होती. परंतु स्वता थोरातांनी त्यांचे खंडन केले. त्यानंतर राज्यात विविध नेत्यांची नावे प्रदेशाध्यक्ष पदासाठी येऊ लागली. यावर आज अमित देशमुख यांनी मोठे विधान केले.
देशमुख म्हणाले, बाळासाहेब थोरात यांनी अत्यंत कठीण काळात पक्षाची धुरा संभाळली. आगामी काळात निवडणुका डोळ्यासमोर ठेवून पक्षश्रेष्ठींनी सध्या तरी प्रदेशाध्यक्ष थोरातांकडेच ठेवावे. त्यांनी अत्यंत प्रभावी काम केले आहे. अशा वेळी त्यांच्या जागी इतर व्यक्तीची निवड करणे योग्य होणार नाही.
COMMENTS