काँग्रेस आमदाराला म्हटले दहशतवादी, गुन्हा दाखल !

काँग्रेस आमदाराला म्हटले दहशतवादी, गुन्हा दाखल !

मालेगाव – काँग्रेस आमदार आसिफ शेख यांना दहशदवादी, जिहादी संबोधून त्यांना धमक्या दिल्या जात असल्याची धक्कादायक माहिती समोर येत आहे. आसिफ शेख यांना तहशतवादी जिहादी म्हणत मुंबईतील कोणतीही सुरक्षा यंत्रणा तुझी सुरक्षा करू शकणार नाही अशा धकमीची क्लिप सध्या सोशल मीडियावर व्हायरल झाली आहे. अशाप्रकारची क्लीप तयार करून ती व्हरायल केल्याप्रकरणी आचार्य जितेंद्र महाराज (मुंबई)आणि मच्छींद्र शिर्के यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. आयेशानगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलीस अधिक तपास करत आहेत.

दरम्यान अशाप्रकारच्या धमक्यांचे फोन गेली काही दिवसांपासून येत असल्याची माहिती आसिफ शेख यांनी दिली आहे. तसेच आपल्याला दहशतवादी आणि जिहादी संबोधून माझी बदनामी केली जात असल्याचा आरोप त्यांनी केला आहे. अशाप्रकारची क्लिप तयार करणा-याला शिक्षा देण्याची मागणी आमदार आसिफ शेख यांनी केली आहे.

COMMENTS