शरद पवारांच्या मनात नक्की चाललंय तरी काय ?

शरद पवारांच्या मनात नक्की चाललंय तरी काय ?

कोल्हापूर – राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी आज कोल्हापूरचा दौरा केला आहे. या दौ-यादरम्यान शरद पवार यांनी पक्षाचे खासदार धनंजय महाडिक यांच्या घरी जाऊन भेट घेतली आहे. त्यांच्यासोबत राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे आणि खासदार महाडिक यांच्या कार्यपध्दतीवर तीव्र नाराजी व्यक्त करुन गरज पडली तर मी लोकसभा निवडणूक लढेन असं वक्तव्य करणारे कोल्हापूर जिल्ह्यातील रास्ट्रवादीचे नेते आमदार हसन मुश्रीफ देखील होते.

राष्ट्रवादीचे खासदार धनंजय महाडिक यांची भाजपशी जवळीक वाढली आहे, त्या पार्श्वभूमीवर शरद पवार हे खासदार महाडिक यांच्या घरी जाणार की नाही याबाबत प्रश्नचिन्ह उपस्थित केलं जात होत. परंतु शरद पवारांनी पवार पॉलिटिक्सप्रमाणे खासदार धनंजय महाडिक यांच्या घरी भेट दिली आणि सोबत खासदार महाडिक यांच्या कार्यपध्दतीवर तीव्र नाराज आसणारे राष्ट्रवादीचे नेते हसन मुश्रीफ यांना देखील घेवून गेले. पवार आणि महाडिक यांच्या या भेटीमुळे पवारांच्या मनात काय चालू आहे असा प्रश्न सध्या राजकीय वर्तुळात सर्वांनाच सतावत असल्याचं दिसत आहे.

COMMENTS