काँग्रेसच्या बंडखोर आमदाराचा मार्ग मोकळा,  मुख्यमंत्र्यांनी हात देत रथात बसविले !

काँग्रेसच्या बंडखोर आमदाराचा मार्ग मोकळा, मुख्यमंत्र्यांनी हात देत रथात बसविले !

औरंगाबाद – काँग्रेसच्या बंडखोर आमदार अब्दुल सत्तार यांचा लवकरच भाजप प्रवेश होणार असल्याची शक्यता वर्तवली जात आहे. कारण सिल्लोडमध्ये आलेल्या मुख्यमंत्र्याच्या महाजनादेश यात्रेत देवेंद्र फडणवीस यांनी आमदार अब्दुल सत्तार यांना हात देत रथात बसविले आहे. त्यामुळे सत्तार हे आता लवकरच भाजप प्रवेश करतील असं बोललं जात आहे.

सत्तार यांच्या भाजप प्रवेशाला औरंगाबादमधील स्थानिक नेत्यांनी विरोध केला आहे. त्यामुळे त्यांचा प्रवेश रखडला होता. परंतु आज स्वत: मुख्यमंत्र्यांनी त्यांचा हात धरत त्यांना रथात बसविले आहे. त्यामुळे सत्तार यांचा भाजप प्रवेशाचा मार्ग मोकळा झाल्याची चर्चा आहे.

आज स्वत: सत्तार यांनी मुख्यमंत्र्याच्या स्वागतासाठी मोठे शक्‍तीप्रदर्शन केले होते. मुख्यमंत्र्याच्या स्वागतासाठी भाजपच्या पदाधिकाऱ्यांनी मोठी तयारी केली होती. सिल्लोड येथे मुख्यमंत्र्याची स्वागतावरून सत्तार आणि भाजप कार्यकर्त्यांमध्ये वाद झाला होता. प्रियदर्शनी चौकात भाजपच्या कार्यकर्त्यांनी स्वागत करणार होते. त्याच ठिकाणी सत्तार यांनी मुख्यमंत्र्यांचे स्वागत केले. यावेळी खुद्द मुख्यमंत्र्यांनी आमदार अब्दुल सत्तार यांना रथात बसविले. कारखाना येथील भवन येथून आमदार सत्तार रथामध्ये बसले होते.

COMMENTS