काँग्रेस आणि राष्ट्रवादीच्या ‘या’ नेत्यांचा भाजपात प्रवेश!

काँग्रेस आणि राष्ट्रवादीच्या ‘या’ नेत्यांचा भाजपात प्रवेश!

मुंबई – आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर औरंगाबादमध्ये काँग्रेस आणि राष्ट्रवादीला जोरदार धक्का बसला आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत राष्ट्रवादी काँग्रेसचे औरंगाबाद माजी शहराध्यक्ष काशिनाथ कोकाटे यांच्यासह काँग्रेसचे नारायण अण्णा सुरगोणीवार यांच्यासह त्यांच्या समर्थकांनी भाजपमध्ये प्रवेश केला आहे. त्यामुळे याठिकाणी काँग्रेस आणि राष्ट्रवादीला मोठा धक्का बसला असल्याचं दिसत आहे.

दरम्यान आज राष्ट्रवादी काँग्रेसचे माजी आमदार दिलीप साेपल यांनी शिवसेनेत प्रवेश केला आहे. तसेच सोलापूर दक्षिण येथील काँग्रेसचे माजी आमदार दिलीप माने यांनीही आज शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या हस्ते शिवबंधन बांधून शिवसेनेत प्रवेश केला आहे. मातोश्री येथे हा पक्षप्रवेश सोहळा पार पडला. सोलापुरातील अनेक गावांत दिलीप माने समर्थकांची सत्ता आहे. त्यांच्या शिवसेना प्रवेशामुळे शिवसेनेची सोलापूर जिल्ह्यात मोठी ताकद वाढली असल्याचं दिसत आहे.

COMMENTS