भाजपाने सत्तास्थापन करताच काँग्रेसचे दोन आमदार गायब !

भाजपाने सत्तास्थापन करताच काँग्रेसचे दोन आमदार गायब !

बंगळुरु – कर्नाटकच्या मुख्यमंत्रीपदी येडियुरप्पा विराजमान झाले आहेत. यानंतर आता येडियुरप्पा यांच्यापुढे बहूमत सिद्ध करण्याचं आव्हान आहे. त्यामुळे आता भाजपचा बहुमत सिद्ध करण्यासाठी घोडेबाजार तेजीत येण्याची शक्यता असल्याचं दिसत आहे. भाजपाने सत्तास्थापन करताच काँग्रेसचे दोन आमदार गायब झाले आहेत. यामुळे काँग्रेसच्या गोटात खळबळ उडाली असून ते दोन्ही आमदार पक्षासोबतच आहेत, असा दावा काँग्रेसने केला आहे.

दरम्यान भाजपाकडे १०४ जागा असून त्यांना ११२ हा निर्णायक संख्याबळाचा आकडा गाठण्यास आणखी आठ आमदारांची गरज आहे. यामुळे कर्नाटकात घोडेबाजार तेजीत येण्याची चिन्हे आहेत. भाजपाकडून आमदार फोडण्याचे प्रयत्न होतील, हे लक्षात घेऊन काँग्रेसने आपल्या आमदारांना ईगलटोन या रिसोर्टवर नेले होते. मात्र, काँग्रेसचे दोन आमदार गायब झाल्याने काँग्रेसच्या गोटात खळबळ उडाली आहे.

 हे दोन आमदार गायब

 मस्कीमधून निवडून आलेले आमदार प्रताप गौडा पाटील आणि बेल्लारीचे आमदार आनंद सिंह हे दोघे ‘गायब’ झाले असल्याची माहिती आहे.

COMMENTS