काँग्रेस-राष्ट्रवादी आघाडीच्या जागावाटपाचा  तिढा अखेर सुटला, ‘असा’ आहे फॉर्म्युला ?

काँग्रेस-राष्ट्रवादी आघाडीच्या जागावाटपाचा तिढा अखेर सुटला, ‘असा’ आहे फॉर्म्युला ?

मुंबई – लोकसभा निवडणूक अवघ्या काही दिवसांवर आली आहे. या निवडणुकीसाठी सर्वच पक्षांनी कंबर कसली आहे. गेली काही दिवसांपासून काँग्रेस-राष्ट्रवादी आघाडीतील जागावाटपाचाही तिढा अखेर सुटला असल्याची माहिती आहे. आघाडीमध्ये प्रत्येकी 20-20 जागा लढवण्यावर जवळपास एकमत झालं आहे. तसेच उरलेल्या आठ जागा प्रकाश आंबेडकरांच्या वंचित बहुजन आघाडीसह मित्र पक्षांना 8 जागा सोडण्याचं काँग्रेस-राष्ट्रवादीनं जवळपास निश्चित केलं आहे. त्यातील चार जागा काँग्रेस आणि चार जागा राष्ट्रवादी सोडणार आहे.

दरम्यान आगामी निवडणुकीत भाजपला पराभूत करण्यासाठी काँग्रेस -राष्ट्रवादी आघाडीचे जोरदार प्रयत्न सुरु आहेत. कोणत्याही परिस्थितीत सर्व विरोधी पक्षांना सोबत घेण्याची तयारी आघाडीनं दर्शवली आहे. त्यामुळे मित्र पक्षांची नाराजी दूर करत त्यांना शक्य तेवढ्या जागा  सोडण्याचा काँग्रेस -राष्ट्रवादी आघाडीचा प्रयत्न आहे. त्यासाठी मित्र पक्षांना 8 जागा सोडून इतर 20-20 जागा  लढवण्याचा निर्णय काँग्रेस -राष्ट्रवादीनं घेतला असल्याची माहिती आहे. परंतु याबाबतचा अंतिम निर्णय काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी आणि राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे अध्यक्ष शरद पवार हे घेणार आहेत. त्यानंतरच उमेदवारांची अंतिम यादी जाहीर केली जाणार आहे.

COMMENTS